• एक कोल्हा सतरा ठिकाणी प्याला.

 • एक गांव बारा भानगडी.

 • एक गोरी आणि हजार खोड्या चोरी.

 • एक घाव दोन तुकडे.

 • एक तीळ सात जणांनी वाटून खावा.

 • एक ना धड बाराभर चिंद्या.

 • एक पंथ दोन काज.

 • एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात.

 • एक पाय मोडल्याने गोम लंगडी होत नाही.

 • एक पुताची माय वळणीवाटे जीव जाय.

 • एक पुत्री रडते, सात पुत्री रडते आणि निपुत्री पण रडते.

 • एक मांसा अन खंडीभर रस्सा.

 • एक वेळ जेवायचे ताट द्यावे पण पाट देवू नये.

 • एकटा जिव सदाशिव.

 • एकमेका सहाय्य करू अवघे धरु सुपंथ.

 • एका कानाचे दुसऱ्या कानाला कळत नाही.

 • एका कानाने ऐकावे, दुसऱ्या कानाने सोडून द्यावे.

 • एका कानावर पगडी, घरी बा‌ईल उघडी.

 • एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे.

 • एका माळेची मणी, ओवायला नाही कुणी.

 • एका म्यानात दोन तलवारी राहात नाहीत.

 • एका हाताने टाळी वाजत नाही.

 • एकाची जळते दाढी, दुसरा त्यावर पेटवी बिडी.

 • एकादशी अनं दुप्पट खाशी.

 • एकादशीच्या घरी शिवरात्र.

 • एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरु मारु नये.

 • ऐंक रे भैंऱ्या, आंब्याच्या कैऱ्या.

 • ऐंकावे जनाचे करावे मनाचे.

 • ऐंट राजाची अऩ वागणूक कैंकाड्याची.

 • ऐंशी तिथे पंच्या‌ऐंशी कर ंडे पुरणपोळ्या.

 • ऐतखा‌ऊ गोसावी, टाळ भैरव बैरागी.

  Make your own free website on Tripod.com