• बड़ा घर पोकळ वासा.

 • बळी तो कान पिळी.

 • बा‌ई ही काही काळाची पत्नी असते पण अनंत काळाची माता असते.

 • बा‌ईचा मात्र हट्ट, पुरुषाची मात्र जिद्द.

 • बा‌ईल गेलीया अऩ झोपा केला.

 • बा‌ईल वेडी लेक पिसा, जाव‌ई मिळाला तोहि तसा.

 • बाज बघुन बाळंतीण व्हावे.

 • बाजारात नाही तुरी भट भटणीला मारी.

 • बाप तसा बेटा, कुंभार तसा लोटा.

 • बाप दाखव नाही तर श्राध्दं कर.

 • बापा परी बाप गेला बोंबलताना हात गेला.   

 • बाबा गेला आणि दशम्याही गेल्या.

 • बायको नाही घरी धोपाटणे उड्या मारी.

 • बारा गावच्या बारा बाभळी.

 • बारा घरचा मुंजा उपाशी.

 • बारा झाली लुगडी तरी भागुबा‌ई उघडी. (बारा लुगडी तरी बा‌ई उघडी.)

 • बाळाचे पाय पाळ्ण्यात दिसतात.

 • बुडत्याचे पाय खोलात.

 • बुडत्याला काडीचा आधार.

 • बुढ्ढ्याले आली मस्ती, नातींशी खेळे कुस्ती.

 • बेशरमाच्या ढुंगणाला फुटले झाड तो म्हणतो मला सावली झाली.

 • बोल बोल नाऱ्या धोतर गेलं वाऱ्या.

 • बोलणाऱ्याचे उडीद सुध्दा विकले जातात पण न बोलणाऱ्याचे गहू पडुन राहतात.

 • बोलण्यात पट्टराघू, कामाला आग लावू.

 • बोलाचीच कढी अऩ बोलाचाच भात.

 • बोले तैंसा चाले त्याची वंदावी पा‌ऊले.

 • बोलेल तो करेल काय? गरजेल तो पडेल काय?

  Make your own free website on Tripod.com