• भटाला दिली ओसरी भट हात पाय पसरी.

 • भरल्या ब्राह्मणाला दही करकरीत.

 • भरवश्याच्या म्हशीला टोणगा.

 • भले भले गेले गोते खात, झिंझुरटे म्हणे माझी काय वाट?

 • भाकरी पहावी काठात आणि मुलगी पहावी ओठात.

 • भागला पडला बावीत, बाव झाली झळझळीत.

 • भातापेक्षा वरण जास्त.

 • भाराबर चिंद्या, शेळीचे शेपुट.

 • भावीण नाचते म्हणून न्हावीण नाचते.

 • भिंतीला कान असतात.

 • भिक नको पण कुत्रा आवर.

 • भिकेत कावळा हागला.

 • भितीवर डोकं आपटून काही होत नाही उलट स्वत:लाच खोक पडते.

 • भित्यापाठी ब्रम्हराक्षस.

 • भुकेच्या तापे करवंदीची कापे.

 • भुकेपेक्षा ब्रम बरा.

 • भुकेला केळं, उपासाला सिताफळ.

 • भुकेला कोंडा अन निजेला धोंडा.

 • भुकेला पिकलं काय? अऩ हिरवं काय?

 • भुरक्यावाचून जेवण नाही अन मुरक्यावाचून बा‌ई नाही.

 • भुरि आणी दहा गुण चोरी.

 • भोळी ग बा‌ई भोळी, लुगड्यावर मागते चोळी, खायला मागते पुरणपोळी.

  Make your own free website on Tripod.com