• चढेल तो पडेल.

 • चने खा‌ईल लोखंडाचे तेव्हा ब्रम्हपदि नाचे.

 • चमडी जा‌ईल पण दमडी जाणार नाही.

 • चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही.

 • चव ना ढव म्हणे खंडाळ्या पोटभर जेव.

 • चांदणे चोराला, उन घुबडाला.

 • चांभाराची नजर जोड्यावर.

 • चांभाऱ्याच्या देवाला खेटराची पूजा.

 • चार आण्याची कोंबडी अऩ बाराण्याचा मसाला.

 • चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे.

 • चारजनांनी केली शेती, मोत्या ऐंवजी पिकली माती.

 • चालत्या गाडीला खीळ घालणे.

 • चिंती परा ते ये‌ई घरा.

 • चिता मेलेल्या माणसाला जाळते, पण चिंता जिवंत माणसाला जाळते.

 • चिपट्यात काय काय करू?

 • चुकलेला फकीर मशिदीत.

 • चुलीतले लाकुड चुलीतच जळाले पाहिजे.

 • चुलीपुढं हागायचं आनं नशिबात होत म्हणायच.

 • चोंघीजणी सुना पाणी का ग द्याना.

 • चोपदार तुपाशी, राजा उपाशी.

 • चोर तो चोर वर शिरजोर.

 • चोर नाही तर चोराची लंगोटी.

 • चोर सोडून संन्याशाला सुळी.

 • चोराच्या उलट्या बोंबा.

 • चोराच्या मनांत चांदणं.

 • चोराच्या वाटा चोरालाच माहीत.

 • चोराच्या हाती जामदाखान्याच्या किल्या.

 • चोराला सुटका, आणि गावाला फटका.

 • चोरावर मोर.

 • चोरीचा मामला हळू हळू बोंबला.

 • चोरून पोळी खा म्हटले तर बोंबलून गुळवणी मागायची.

 • चोळीला आणि पोळीला कुणी कमी नसते.

  Make your own free website on Tripod.com