दक्षिणा तशी प्रदक्षिणा.
दगडापेक्षा विट मऊ.
दमडीची नाही मिळकत आणि घडीची नाही फुरसत.
दहा गेले पाच उरले.
दहा मरावे पर दहांचा पोशिंदा मरु नये.
दही वाळत घालून भांडण.
दांत आहे तर चणे नाहीत, चणे आहेत तर दांत नाहीत.
दांत कोरून पोट भरतो.
दाणा दाणा टिपतो पक्षी पोट भरतो.
दानवाच्या घरी रावण देव.
दाम करी काम.
दारात नाही आड म्हणे लावतो झाड.
दिंडी दरवाजा उघडा ठेवायचा आणि मोरीला बोळा घालायचा.
दिल्या भाकरीचा सांगितल्या चाकरीचा.
दिवस गेला रेटारेटी, चांदण्यात बसली कापूस वेचीत.
दिवस बुडाला मजूर उडाला.
दिवस मेला इथं तिथं अन रात्र झाली निजु कुठं.
दिवसा चुल रात्री मूल.
दिवाळी दसरा हात पाय पसरा.
दिव्याखाली नेहमीच अंधार.
दिसतं तस नसतं म्हणून तर जग फसतं.
दुःख रेड्याला न डाग पखालीला.
दुखणे हत्तीच्या पायाने येते आणि मुंगीच्या पायाने जाते.
दुध पोळलं की ताक फुंकून प्यावे.
दुधात साखर आणि आंघोळीत लघवी.
दुधापेक्षा सायीवर प्रेम जास्त.
दुभत्या गाईच्या लाथा गोड.
दुरून डोंगर साजरे.
दुर्जनसंगापेक्षा एकांतवास बरा.
दुष्काळात तेरावा महिना.
दुसऱ्या वरती विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला.
दुसऱ्याची कामीनी ती मानवाची जननी.
दृष्टी आड सृष्टी.
दृष्टी सर्वांवर प्रभुत्व एकावर.
दे बाय लोणचे, बोलेन तुझ्या हारचे!
दे माय धरणी ठाय. (हे माय, धरणी ठाय.)
देखल्या देवा दंडवत.
देणं न घेणं आणि कंदिल लावून येणं.
देण कुसळाच, करणं मुसळाच.
देणाऱ्याचे हात हजार.
देणे ना घेणे दोन्ही सांजचे येणे.
देणे ना घेणे रिकामे गाणे.
देव तारी त्याला कोण मारी.
देव भावाचा भुकेला.
देव लागला द्यायला पदर नाही घ्यायला.
देवाचं नावं अऩ स्वताच गावं.
देवाची करणी आणि नारळात पाणी.
देश तसा वेश.
देह देवळात चित्त पायतणात.
दैव देतं अऩ कर्म नेतं.
दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ.
दोघींचा दादला उपाशी.
दोन डोळे शेजारी, भेट नाही संसारी.
दोन्ही घरचा पाहुणा उपाशी.
द्या दान सुटे गिरान (ग्रहण).