• घटकेत सौभाग्यवती घटकेत गंगा भागीरथी.

 • घटाकभर नाही माप अन रात्री ये‌ई हिवताप.

 • घर गेले विटाळा शेत गेले कटाळा.

 • घर चंद्रमोळी पण बायकोला साडीचोळी.

 • घर ना दार चावडी बिऱ्हाड. (घर ना दार वाऱ्यावर बिऱ्हाड.)

 • घर फिरले की वासेही फिरतात.

 • घर साकड नि बा‌ईल भाकड.

 • घरचा उंबरठा दारालाच माहीत.

 • घरची करती देवा देवा, बाहेरचीला चोळी शिवा.

 • घरचे झाले थोडे अऩ व्याहीने धाडले घोडे.

 • घरच्याच चिंचेने दात आंबलेत त्यात व्याहयाने धाडलाय वानवळा.

 • घरांत नाही दाणा मला बाजीराव म्हणा.

 • घराची कळा अंगण सांगते.

 • घरात घरघर चर्चा गावभर.

 • घरात घाण, दारात घाण, कुठे गेली गोरीपान.

 • घरात नाही एक तीळ पण मिशांना देतो पीळ.

 • घरात नाही कौल, रिकामा डौल.

 • घरात नाही तुरी भट भटणीला मारी.

 • घरात नाही दाणा मला बाजीराव म्हणा.

 • घरासारखा गुण, सासू तशी सून.

 • घरी नको झालेल्या माणसाला रस्त्यावरची माकडे पण दगड मारतात.

 • घरोघरी त्याच परी, सांगेना तीच बरी.

 • घरोघरी मातीच्या चुली.

 • घा‌ईत घा‌ई अन म्हातारीला न्हाणं ये‌ई.

 • घाण्याचा बैल.

 • घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी.

 • घुगऱ्या मुठभर, सारी रात मरमर.

 • घुसळतीपेक्षा उकळतीचे घरी अधिक.

 • घे सुरी आणि घाल उरी.

 • घेणे न देणे, कंदिल लावून जाणे.

 • घोंगड अडकलं.

 • घोडं झालय मराया बसणारा म्हणतो मी नवा.

 • घोडामैदान जवळ असणे.

 • घोडे खा‌ई भाडे.

 • घोड्यावर हौदा, हत्तीवर खोगीर.

  Make your own free website on Tripod.com