• हगत्या लाज की बघत्या लाज?

 • हजाराचा बसे घरी, दमडीचा येरझाऱ्या घाली.

 • हजीर तो वजीर.

 • हत्ती गेला अऩ शेपुट राहिले.

 • हत्ती पोसवतो पण लेक नाही पोसवत.

 • हत्तीवर अंबारी जाते कुत्री भुंकत राहतात.

 • हलवायाच्या घरावर तुळशीपत्र.

 • हसणाऱ्याचे दांत दिसतात.

 • हा सुर्य अऩ हा जयद्रथ.

 • हागणाऱ्याला लाज नाही पण भागणाऱ्याला आहे.

 • हात दाखवून अवलक्षण.

 • हात फिरे तिथे लक्ष्मी वसे.

 • हातचं (गणित) ठेवून वागावे.

 • हातचे सोडून पळत्याच्या मागे.

 • हातच्या काकणाला आरसा कशाला?

 • हाताची पाचही बोटे कधीही सारखी नसतात.

 • हातात कवडी विद्या दवडी.

 • हातानं हो‌ईना काही तोंड घेतं घा‌ई.

 • हाती घ्याल ते तडीस न्या.

 • हाती नाही अडका, बाजारात धडका.

 • हाती नाही आणा, मला कारभारी म्हणा.

 • हिंग गेला, वास राहीला.

 • ही काळ्या दगडावरची रेघ.

 • हे बालाजी, छप्पन्न कोटींचा चतुर्थांश.

 • हेंदरं ते हेंदरं आणि गावंदरीला चरायला चाललयं.

 • होता जिवा म्हणून वाचला शिवा.

 • होळी जळाली, थंडी पळाली.

 • हौसेनं केला पति, त्याला भरली रक्तपीती.

  Make your own free website on Tripod.com