• जंगलात नाही वावर आणि गावात नाही घर.

 • जगाच्या कल्याणा संताची विभुती.

 • जनाची नाही तरी मनाची तरी जरा.

 • जनात बुवा आणि मनात कावा.

 • जन्मा आला हेला, पाणी वाहता मेला.

 • जमता दशमा ग्रह.

 • जया अंगी मोठेपणं त्यास यातना कठिण.

 • जलात राहून माशाशी वैर कशाला?

 • जळतं घर भाड्याने कोण घेणार?

 • जवा येतील चांगली येळ, गाजराच बी व्हतय केळं.

 • जशास तसे.

 • जशी कामना तशी भावना.

 • जशी देणावळ तशी धुणावळ.

 • जशी नियत तशी बरकत.

 • जसा गुरु तसा चेला.

 • जसा भाव तसा देव.

 • जा‌ईचा डोळा नि आसवांचा मेळा.

 • जातीसाठी खावी माती.

 • जात्यातले रडतात, सुपातले हसतात.

 • जात्यावर बसले की ओवी सुचते.

 • जानवे घातल्याने ब्राह्मण होत नाही.

 • जाळाशिवाय नाही कढ अऩ माये शिवाय नाही रड.

 • जाव‌ई पाहुणा आला म्हणून रेडा दुध दे‌ईल काय?

 • जाव‌ई माझा भला आणि लेक बा‌ईलबुध्या झाला.

 • जावयाचं पोर हरामखोर.

 • जावा जावा आणि उभा दावा.

 • जावा जावा हेवा देवा.

 • जिकडे पोळी तिकडे गोंडा घोळी.

 • जिकडे सु‌ई तिकडे दोरा.

 • जिच्या घरी ताक तिचे वरती नाक.

 • जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाते उध्दारी.

 • जित्याची खोड मेल्यावाचून जात नाही.

 • जिथे कमी तिथे आम्ही.

 • जी नाही गोंदणार ती नाही नांदणार.

 • जुनं ते सोनं नवं ते हवं.

 • जे न देखे रवि ते देखे कवि.

 • जे पिंडी ते ब्रम्हांडी.

 • जे फुकट ते पौष्टीक.

 • जेथे पिकतं तिथे विकतं नाही.

 • जेवान जेवाव पंगतीत अन मरान मागावं उमदीत.

 • जो गुण बाळा तो जन्म काळा.

 • जो नाक धरी, तो पाद करी.

 • जो श्रमी त्याला काय कमी.

 • जोकून खाणार, कुंथुन हागणार.

 • जोवरी पैसा तोवरी बैसा.

 • ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाभळी.

 • ज्या गावाला जायचे नाही त्य गावचा रस्ता विचारू नये.

 • ज्याचं करावं भलं तोच म्हणतो आपलचं खर.

 • ज्याचं जळतं त्यालाच कळतं.

 • ज्याचं त्याला आणि गाढव वझ्याला.

 • ज्याचा त्याला चोप नाही आणि शेजाराला झोप नाही.

 • ज्याची करावी चाकरी त्याचीच खावी भाकरी.

 • ज्याची दळ त्याचे बळ.

 • ज्याचे पदरी पाप त्याला मुली आपो‌आप.

 • ज्याच्या हाती ससा तो पारधी.

 • ज्याच्यासाठी लुगडं तेच उघडं.

 • ज्याला आहे भाकरी त्याला कशाला चाकरी.

 • ज्याला नाही अक्कल त्याची घरोघरी नक्कल.

 • ज्याला समजावा कोरड्या पाटीचा तोच निघाला आतल्या गाठीचा.

 • ज्वारी पेरली तर गहू कसा उगवणार?

  Make your own free website on Tripod.com