• न कर्त्याचा वार शनिवार.

 • न खाणाऱ्या देवाला नेवेद्य.

 • न लागो पुत्राचा हात पण लागो डोंब्या महाराची लाथ.

 • नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न.

 • नकटे व्हावे पण धाकटे हो‌ऊ नये.

 • नको तिथं बोटं घालू नये, घातलेच तर वास घेत बसू नये.

 • नगाऱ्याची घाय तिथे टिमकीचे काय?

 • नमनाला घडाभर तेल.

 • नरो वा कुंजारोवा.

 • नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे.

 • नवरा केला सुखासाठी, पैसा नाही कुकासाठी.

 • नवरा नाही घरी सासरा जांच करी.

 • नवऱ्याने मारले पावसाने झोडपले तक्रार कुणाकडे न्यायची.

 • नवा कावळा शेण खायला शिकला.

 • नव्याची नवला‌ई.

 • नव्याचे न‌ऊ दिवस.

 • नसुन खोळंबा असुन दाटी.

 • ना घरचा ना घाटचा.

 • नांदणाऱ्याला पळ म्हणायचे आणि पळणाऱ्याला नांद म्हणायचे.

 • नांव अन्नपुर्णा, टोपल्यात भाकर उरेना.

 • नांव गंगुबा‌ई अऩ तडफडे तान्हेने. (नांव गंगाबा‌ई अन तडफडे तहानेने). (नांव गंगाबा‌ई, रांजनात पाणी नाही).

 • नांव महीपती, तीळभर जागा नाही हाती.

 • नांव मोठे लक्षण खोटे.

 • नांव सगुणी करणी अवगुणी.

 • नांव सुलोचना आणि डोळ्याला चष्मा.

 • नांव सोनुबा‌ई अन हाथी कथिलाचा वाळा.

 • नाक दाबले की तोंड उघडते.

 • नाकपेक्षा मोती जड.

 • नाकाला नाही जागा, नाव चंद्रभागा

 • नाकावर पदर अन विशीवर नजर.

 • नागड्या कडे उघडा गेला आणि हिवाने मेला.

 • नागोबा म्हसोबा पेंश्याला दोन, पंचमी झाल्यावर पुजतयं कोण?

 • नाचता ये‌ईना म्हणे अंगण वाकडे, स्वयंपाक ये‌ईना म्हणे ओली लाकडे.

 • नात्याला नाही पारा, निजायला नाही थारा.

 • नाम असे उदार कर्ण, कवडी देता जा‌ई प्राण.

 • नारो शंकराची घंटा.

 • नालासाठी घोडं.

 • नाव सोनुबा‌ई हाथी कथिलाचा वाळा.

 • नाव्ह्याचा उकरंडा कितीही उकरला तरी केसच निघणार.

 • नाही चिरा, नाही पणती.

 • नाही निर्मल मन काय करील साबण.

 • निर्लज्याच्या गांडीवर घातला पाला गार लागला अजून घाला.

 • नेमेचि येतो मग पावसाळा.

 • नेशीण तर पैठणी नाहीतर नागवी बसेन.

 • न्हाणीला बोळा आणि दरवाजा मोकळा.

  Make your own free website on Tripod.com