प्रत्येक भाषेमध्ये असे काही विषिष्ट शब्द, वाक्यरचना असते ती कधीच दुसऱ्या भाषेमध्ये रुपांतर करता येत नाही. त्या शब्दांना एक प्रकारचे वजन असते, ते दुसऱ्या भाषेमध्ये रुपांतरीत करता येत नाही. या विशिष्ट शब्दांना, वाक्यरचनेला तेथील लोकांचा, त्या समाजाच्या आणि त्या गावाचा एक सांस्कृतिक वारसा लाभलेला असतो. या वाक्यारचने मध्ये तेथील जनावरांचा, फुलांचा, फळांचा, सणांचा प्रभाव दिसून येतो. जनावरांच्या वागणूकीचे, त्यांच्या सवयींची प्रखर जाणीव या वाक्यरचनेतून दिसून येते. अशी वाक्यरचना वापरून संभाषण केले जाते. त्या वाक्यरचना खूप काही सांगून जातात. कधी कधी ही वाक्यरचना वापरली म्हणून झालेली भांडणे झालेली ऐकली आहेत. पु. ल. देशपांडेनी म्हटल्या प्रमाणे 'हीच्या हातच्या थालीपीठाची चवं कश्या कश्याला नाही' या वाक्याचे रूपांतर कसे करणार?

 

तर अशीच काही म्हणींची सूची इथे तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या म्हणी वेग वेगळ्या गावात काही शब्द बदलून किंवा तेथील काही गोष्टींचा उपयोग करून वेग वेगळ्या तऱ्हेने वापरली जातही असतील. या सगळ्या म्हणींची सूची इथे तयार करण्यात आली आहे. या सूची मध्ये तुम्हाला काही भर घालायची असेल किंवा या सूची मध्ये बदल सुचवायचा असेल तर मला जरूर कळवा. आपल्या सहकार्याशिवाय ही सूची अपूर्ण आहे. आपली ही मराठी बोली अशीच वाढवायचा हा प्रयत्न चालू ठेवूयात.

 

ही सूची आता 'युनी कोड' मध्ये आपल्यासमोर साजर करीत आहे. यात काही त्रुटी असतील त्या मला कळवाव्यात आपल्या सुचनांची दखल नक्कीच घेतली जाईल.

 

या म्हणींच्या संग्रहात कोणत्याही जाती, जमाती, विषिष्ट व्यवसायिक, अपंग अथवा इतर कोणत्याही बाबींची अहवेलना करण्याचा कोणताही हेतू नाही. या म्हणीं आहेत तश्या आपल्यासमोर मांडण्याच्या हेतू आहे. यातील या बाबींच्या उल्लेखांकडे भाषेंचे सौंदर्य या दृष्टीने पहाण्याची नम्र विनंती.

Make your own free website on Tripod.com