• रंग जाणे रंगारी, धुनक जाणे पिंजारी!

 • रंग झाला फिका आणि दे‌ईना कुणी मुका.

 • रंगाने गोरी पण हजार गुण चोरी.

 • रंग गोरापान आणि घरात गु घान.

 • रा‌ईचा पर्वत.

 • राजा उदार झाला अऩ हाती भोपळा दिला.

 • राजा तशी प्रजा.

 • राजा बोले अऩ दल चाले.

 • राजाला दिवाळी काय ठा‌ऊक?

 • रात्र थोडी अऩ सोंग फार.

 • रिकामा नावी कुडाला तुंबे लावी. (रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी.)

 • रुखवत आलं, रुखवत आलं उघडा खिडकी, पाहिलं तर फाटकीच फडकी.

 • रुखवत आले, रुखवत आले दणाणली आळी, पहातात तो अर्धीच पोळी.

 • रोज घालतयं शिव्या अन एकादशीला गातयं ओव्या.

 • रोज मरे त्याला कोण रडे.

  Make your own free website on Tripod.com