• संन्यासाच्या लग्नाला शेंडीपासून (सुरुवात) तयारी.

 • सख्ख्या सासूला दिली लाथ, चुलत सासूचा कापला कान, तिथे मामे-सासू मागते मान.

 • सगळं मुसळ केरात.

 • सतरा कारभारी ऐक नाही दरबारी.

 • सतरा पुरभय्ये अऩ अठरा चुली.

 • सदाला चोळी आणि वऱ्हाडाला पोतेरी.

 • सरड्याची धांव कुंपणापर्यंत अन मुल्लाची मशिदीपर्यंत.

 • सळो की पळो केले.

 • सवळं दाट अन महारवाड्यातून वाट.

 • ससा उठला आणि कुत्रे हागायला बसले.

 • साखरेचे खाणार द्याला देव देणार.

 • साठी बुध्दी नाठी.

 • साडी नेली बायनं नि चिंधी नेली गायनं.

 • सात सुगरणी, भाजी अळणी.

 • साता उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी संपूर्ण.

 • साता समुद्राकडे राजाने लावला भात, ऐक ऐक शीत न‌ऊ न‌ऊ हात.

 • साधली तर शिकार नाही तर भिकार.

 • साधी राहणी अनं उच्च विचार सरणी.

 • साध्वा जाते विधवेपाशी आशिर्वाद मागायला, ती म्हणते माझ्यासारखीच हो!

 • साप मुंगसाचे वैर.

 • साप म्हणू नये आपला, नवरा म्हणू नये आपला.

 • सारा गांव मामाचा एक नाही कामाचा.

 • सासू तशी सून आणि उंबऱ्या तुझा गुण.

 • सासू न सासरा जांच करे तिसरा.

 • सासू नाही घरी, नणंद जाच करी.

 • सासू मेली ठीक झाले, घरदार हाती आले.

 • सासू सांगे सुने बोध, आपण पी ऊन ऊन दुध.

 • सासू सांगे सुनेला आणि आपण जा‌ई गोल्या पाठून.

 • सासू सुनेची भांडणं, सगळ्या गावाला आमंत्रणं.

 • साहेबंनी रेड्याचे दुध काढले तर तो चरवी कुठे आहे म्हणून विचारतो.

 • सुंठेवाचून खोकला गेला.

 • सु‌ईण आहे, तो पर्यंत बाळंत हो‌ऊन घ्यावे.

 • सुख रा‌ई एवढे दु:ख पर्वता एवढे.

 • सुगंध पसरावयाचा असेल तर चंदनाला झिजावे लागते.

 • सुतावरून स्वर्ग गाठायचा.

 • सुसरबा‌ई, तुझी पाठ म‌ऊ.

 • सोनार शिंपी कुलकर्णी अप्पा, यांची संगत नको रे बाप्पा.

 • सोन्याची सुरी असली म्हणून काय उरात खुपसुन घ्यायची.

 • सोन्याहून पिवळे.

 • सोवळं सोडल्यावर ओवळं सापडू नये.

 • स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही.

 • स्वत:ची सावली विकून खाणारी माणसं.

 • स्वभावाला औषध नाही.

 • स्वामी तिन्ही जगाचा आ‌ईविना भिकारी.

  Make your own free website on Tripod.com