त वरून ताकभात.
तण खाई धन.
तरणी पडली धरणी अन म्हातारी झाली हरिणी.
तरण्या झाल्या बरण्या आणि म्हाताऱ्या झाल्या हरण्या.
तरण्याचे झाले कोळसे अन म्हाताऱ्याला आले बाळसे.
तरण्याला लागली कळ, म्हाताऱ्याला आलयं बळ.
तळहाताने चंद्र झाकत नाही.
तळे राखी तो पाणी चाखी.
तवा तापला तोवर भाकरी भाजून घ्यावी.
तहान लागल्यावर आड खणणे.
ताकातल्या तुपासारखे, सौंदर्य.
ताकापुरते रामायण.
ताकाला जायचे अनं भांडे लपवायचे.
तागास तूर लागू न देणे.
ताटाखालचं मांजर.
ताटात सांडलं काय नि वाटीत सांडलं काय एकच.
तारेवरची कसरत.
ती नाही घरी नी गमजा करी.
तीन तिघडा काम बिघाडा.
तु दळ माझे, मी दळीण गावच्या पाटलाचे.
तुकाराम बुवांची मेख.
तुझं अऩ माझं जमेना तुझ्यावाचुन करमेना.
तुप खाल्ले की लगेच रुप येत नाही.
तुम्ही करा अऩ आम्ही निस्तरा.
तुरात दान, महापुण्य.
तुला नं मला, घाल कुत्र्याला.
तुळशी तुळशी तुला पाणी कळशी कळशी, पण वेळ मिळेले त्या दिवशी.
तेरड्याचे रंग तीन दिवस.
तेल गेले, तुप गेले, हाती आले धोपाटणे.
तेलणीवर रुसली अंधारात बसली.
तोंड करी बाता अन ढुंगण खाई लाथा.
तोंड दाबून बुक्क्यांचा मार.
तोंडात तीळ भिजत नाही.
तोबऱ्याला पुढे लगामाला मागे.
त्यात काही राम नाही.