• उंच वाढला एरंड तरी हो‌ईना इक्षुदंड.

 • उंट पाण्यात बुडालाय नि शेळी म्हणतीय मी ये‌ऊ काय?

 • उंटावरचा शहाणा.

 • उंदराला मांजराची साक्ष.

 • उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी.

 • उघड्याकडे नागडा गेला अनं रात्रभर हिवाने मेला.

 • उचलली जीभ लावली टाळ्याला.

 • उठता लाथ, बसता बुक्की.

 • उडत्या पक्षाची पिसे मोजणे.

 • उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक.

 • उतावळा नवरा घुडग्याला बाशिंग.

 • उत्तम शेती, माध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी.

 • उथळ पाण्याला खळखळाट फार.

 • उद्योगाचे घरी रिध्दी सिध्दी पाणी भरी.

 • उधार पाधार वाण्याचा आधार.

 • उधार तेल खवट.

 • उधार पाधार वाण्याचा आधार.

 • उधारीचे पोते, सव्वा हात रिते.

 • उन पाण्याचे घर जळत नसते.

 • उपट सुळ, घे खांद्यावर.

 • उभारले राजवाडे तेथे आले नकवडे.

 • उभ्याने यावे आणि ओणव्याने जावे.

 • उश्याच केल पायतर तरी बुड मध्येच.

 • उसना पसारा देवाचा आसरा.

 • उसळात घातलं तर मुसळात सापडत नाही.

 • उसाच्या पोटी कापूस.

 • ऊस गोड लागला म्हणून मुळासगट खावू नये.

 • ऊस झाला डोंगा परी रस नाही डोंगा.

  Make your own free website on Tripod.com