• वड्याचे तेल वांग्यावर.

 • वर झगझग आत भगभग.

 • वर मुकुट आणि खाली नागडं.

 • वराती मागून घोडे.

 • वरुन दिसे सोज्वळ आतून सावळा गोंधळ.

 • वरून कीर्तन आतून तमाशा.

 • वळचळीचे पाणी आड्याला कसे चढेल.

 • वळले तर सूत नाही तर वडावरचे भूत. (असेल तर सूत नाही तर वडावरचे भूत).

 • वळवाचा पा‌ऊस.

 • वळू ऊठला पण संशय फिटला.

 • वाघ पडला बावी, केल्डं गांड दावी.

 • वाचेल तो वाचेल.

 • वाजे पा‌उल आपले म्हणे मागून कोण आले.

 • वाटाण्याच्या अक्षता.

 • वासरात लंगडी गाय शहाणी.

 • वाहता झरा अन फुलता मळा असला तरचं ठीक.

 • विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर.

 • विचारांची तूट तेथे भाषणाला उत.

 • विनाशकाले विपरीत बुध्दी.

 • विल्याभोपळाचे साक्ष.

 • विषाची परीक्षा.

 • विहीणाचा पापड वाकडा.

 • वीतभर गजरा गावभर नजरा.

 • वेळना वखत आऩ गाढव चाललय भुकत.

 • वेळेला केळं अऩ वनवासाला सिताफळं.

 • वेश असे बावळा परी अंतरी नाना कळा.

 • वैरी गेला अन जागा पैस झाला.

  Make your own free website on Tripod.com