आठवणीतल्या म्हणींची साठवण.

   

 1. "ग" ची बाधा झाली.

 2. गंगा वाहते तोवर हात धुवून घ्यावे.

 3. गंगेत घोडं न्हालं.

 4. गरज सरो अऩ वैद्य मरो.

 5. गरजवंताला अक्कल नसते.

 6. गरजेल तो पडेल काय?

 7. गरीबाच्या दाराला सावकाराची कडी.

 8. गरीबानं खपावं, धनिकाने चाखावं.

 9. गळा नाही सरी, सुखी निंद्रा करी.

 10. गळ्यातले तुटले ओटीत पडले.

 11. गवयाचे मुल सुरांनीच रडणार.

 12. गांवचा गांव जळे आणि हनुमान बेंबी चोळे.

 13. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली.

 14. गाठ पडली ठकाठका.

 15. गाढव माजला की तो अखेर आपलेच मुत पितो.

 16. गाढवं मेलं ऒझ्याने अन शिगरू मेलं हेलपाट्याने. (घोडी मेली ओझ्यानं नि शिंगरू मेलं हेलपाट्यानं.)

 17. गाढवा समोर वाचली गिता, कालचा गोंधळ बरा होता.

 18. गाढवाचा गोंधळ लाथाचा सुकाळ.

 19. गाढवाच्या पाठीवर साखरेची गोणी.

 20. गाढवाच्या लग्नांला शेंडीपासून तयारी.

 21. गाढवाने शेत खाल्ले, पाप ना पुण्य.

 22. गाढवाला गुळाची चवं काय?

 23. गाता गळा, शिंपता मळा.

 24. गावंढ्या गावात गाढवी सवाशीण.

 25. गाव करी ते राव न करी.

 26. गाव करील ते राव करील काय?

 27. गाव तिथे उकिरडा.

 28. गावात नाही झाड अनं म्हणे एरंड्याला आला पाड.

 29. गावात घर नाही रानात शेत नाही.

 30. गुप्तदान महापुण्य.

 31. गुरवाचे लक्ष निविद्यावर (नैवेद्यावर).

 32. गुरुची विद्या, गुरुलाच फळली.

 33. गुलाबाचे कांटे जसे आ‌ईचे धपाटे.

 34. गुळवणी नाहीतर गुळाचार कुठून?

 35. गुळाचाच गणपती, गुळाचाच नेवैद्य.

 36. गुळाला मुंगळे चिकटतातच.

 37. गोगल गाय पोटात पाय.

 38. गोड बोलून गळा कापणे.

 39. गोफण पडली तिकडे, गोटा पडला इकडे.

 40. गोरा गोमटा आणि कपाळ करंटा.

 41. गोष्ट लहान, सांगण महान.

 42. गोष्टी गोष्टी आणि मेला कोष्टी.

 43. गोसाव्याशी झगडा आणि राखाडीशी भेट.


| मुख्य पान | प्रस्तावना | आभार | पाउलवाट | पाउलखुणा | प्रतिसाद | माझ्या आठवणीतली म्हण |
a aa o au aM aH i I u uu e ai a aa o au aM aH ru ka kha ga gha ca cha ja jha t Th Da Dh na ta tha d dha n pa fa ba bha ma ya ra l va sh sha sa ha la ksha dnya shra
| Home | Introduction | Thanks! | View My Guestbook | Sign My Guestbook | Send feedback! | Add Mhan |