आठवणीतल्या म्हणींची साठवण.

   

 1. घटकेत सौभाग्यवती घटकेत गंगा भागीरथी.

 2. घटाकभर नाही माप अन रात्री ये‌ई हिवताप.

 3. घर गेले विटाळा शेत गेले कटाळा.

 4. घर चंद्रमोळी पण बायकोला साडीचोळी.

 5. घर ना दार चावडी बिऱ्हाड. (घर ना दार वाऱ्यावर बिऱ्हाड.)

 6. घर फिरले की वासेही फिरतात.

 7. घर साकड नि बा‌ईल भाकड.

 8. घरचा उंबरठा दारालाच माहीत.

 9. घरची करती देवा देवा, बाहेरचीला चोळी शिवा.

 10. घरचे झाले थोडे अऩ व्याहीने धाडले घोडे.

 11. घरच्याच चिंचेने दात आंबलेत त्यात व्याहयाने धाडलाय वानवळा.

 12. घरांत नाही दाणा मला बाजीराव म्हणा.

 13. घराची कळा अंगण सांगते.

 14. घरात घरघर चर्चा गावभर.

 15. घरात घाण, दारात घाण, कुठे गेली गोरीपान.

 16. घरात नाही एक तीळ पण मिशांना देतो पीळ.

 17. घरात नाही कौल, रिकामा डौल.

 18. घरात नाही तुरी भट भटणीला मारी.

 19. घरात नाही दाणा मला बाजीराव म्हणा.

 20. घरासारखा गुण, सासू तशी सून.

 21. घरी नको झालेल्या माणसाला रस्त्यावरची माकडे पण दगड मारतात.

 22. घरोघरी त्याच परी, सांगेना तीच बरी.

 23. घरोघरी मातीच्या चुली.

 24. घा‌ईत घा‌ई अन म्हातारीला न्हाणं ये‌ई.

 25. घाण्याचा बैल.

 26. घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी.

 27. घुगऱ्या मुठभर, सारी रात मरमर.

 28. घुसळतीपेक्षा उकळतीचे घरी अधिक.

 29. घे सुरी आणि घाल उरी.

 30. घेणे न देणे, कंदिल लावून जाणे.

 31. घोंगड अडकलं.

 32. घोडं झालय मराया बसणारा म्हणतो मी नवा.

 33. घोडामैदान जवळ असणे.

 34. घोडे खा‌ई भाडे.

 35. घोड्यावर हौदा, हत्तीवर खोगीर.


| मुख्य पान | प्रस्तावना | आभार | पाउलवाट | पाउलखुणा | प्रतिसाद | माझ्या आठवणीतली म्हण |
a aa o au aM aH i I u uu e ai a aa o au aM aH ru ka kha ga gha ca cha ja jha t Th Da Dh na ta tha d dha n pa fa ba bha ma ya ra l va sh sha sa ha la ksha dnya shra
| Home | Introduction | Thanks! | View My Guestbook | Sign My Guestbook | Send feedback! | Add Mhan |