आठवणीतल्या म्हणींची साठवण.

   

 1. लंगडं लागलं कामाला आन चौघं तंगडं धरायला.

 2. लंकेत सोन्याच्या विटा.

 3. लकडी शिवाय मकडी वळत नाही.

 4. लग्न बघावे करून अऩ घर पहावे बांधून.

 5. लढा‌ईमे बढा‌ई आणि खजिनेमे गवऱ्या.

 6. लबाडाचे आमंत्रण जेवल्याबिगर खोटे.

 7. लवकर उठे, लवकर निजे त्यास आरोग्य, संपत्ती लाभे.

 8. लहान तोंडी मोठा घास.

 9. लांड्यामागे पुंडा.

 10. लाखाचे बारा हजार.

 11. लाखाशिवाय बात नाही अन वडापाव शिवाय काही खात नाही.

 12. लाडावली गुरंविन देवळात हागे, ढुंगण धुवायला महादेव मागे.

 13. लाथ मारेन तिथे पाणी काढीन.

 14. लाल केला मागील पाठ विसरून गेला.

 15. लेक द्यावी श्रीमंताघरी सून करावी गरीबाकडली.

 16. लेक नाही तोवर लेवून घ्यावे सून नाही तोवर खा‌ऊन घ्यावे.

 17. लेकी बोले सुने लागे.

 18. लेकीच लेकरं उडती पाखरं, लेकाची लेकरं चिकट भोकरं.

 19. लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण कोरडे पाषाण.

 20. लोकाचे लेणे ले ग लुचरे, मागायला आली दे ग कुत्रे.


| मुख्य पान | प्रस्तावना | आभार | पाउलवाट | पाउलखुणा | प्रतिसाद | माझ्या आठवणीतली म्हण |
a aa o au aM aH i I u uu e ai a aa o au aM aH ru ka kha ga gha ca cha ja jha t Th Da Dh na ta tha d dha n pa fa ba bha ma ya ra l va sh sha sa ha la ksha dnya shra
| Home | Introduction | Thanks! | View My Guestbook | Sign My Guestbook | Send feedback! | Add Mhan |