आठवणीतल्या म्हणींची साठवण.

   

 1. म‌ऊ लागले म्हणून कोपऱ्याने खणू नये.

 2. मड्याच्या टाळुवरचे लोणी खाणारा.

 3. मनी चिंती ते वैरीही न चिंती.

 4. मनी नाही भाव देवा मला पाव.

 5. मनी वसे ते स्वप्नी दिसे.

 6. मरावे परी किर्तिरुपे उरावे.

 7. मला नं तुला, घाल कुत्र्याला.

 8. मला पहा अन फुलं वहा.

 9. महादेवापुढे नंदी असायचाच.

 10. मांजर डोळे मिटून दुध पिते पण ते जगाला दिसतचं.

 11. माकड म्हणतं माझीच लाल.

 12. माकडाच्या हातात कोलीथ.

 13. माझा लोक तुझ्या घरी अन तुपानं तोंड भरी.

 14. माझा ह्यां असा, बायकोचा तां तसा, गणपतीचा हो‌ऊचा कसा?

 15. माणूस पाहून शब्द टाकावा, अऩ जागा पाहून घाव मारावा.

 16. मातीचे कुल्ले वाळले की पडायचेच.

 17. मानूस म्हनावा तर अक्कल न्हायी आनी गाढाव म्हनावा तर शेपुट नायी.

 18. माय मरो पण मावशी उरो.

 19. मारा पण तारा.

 20. मालकाचे हाल शेजारचा तांबडा पाल.

 21. माळावर बोंबलायला पाटलाला काय विचारायचं?

 22. मिंया बिबी, तेगार भिंतीला उभी.

 23. मिया मुठभर, दाढी हातभर.

 24. मी नाही त्यातली अऩ कडी लावा आतली.

 25. मी बा‌ई संतीण माझ्या मागे दोन तीन.

 26. मी हसते लोकांना अनं शेबुड माझा नाकाला.

 27. मुंगी व्यायली, शींगी झाली, दुध तिचे किती, बारा रांजण भरून गेले, सतरा हत्ती पि‌उन गेले.

 28. मुंगी हत्तीच्या ढुंगणाला चावू शकते पण हत्ती मुंगीच्या नाही.

 29. मुंगेच्या मुताला महापूर.

 30. मुग गिळून गप्प बसावे.

 31. मुठभर घुगऱ्या अन सारीरात मचंमचं.

 32. मुर्ती लहान पण किर्ती महान.

 33. मुळांपोटी केरसुनी.

 34. मुशा पाहून मुशारा घोडा पाहून खरारा.

 35. मेलेलं कोंबडं आगीला भित नाही.

 36. मेल्या म्हशीला मणभर (शेरभर) दूध.

 37. मेल्यावाचून स्वर्ग दिसत नाही.

 38. मोडेन पण वाकणार नाही.

 39. मोले घातले रडाया, नाही आसू, नाही माया.

 40. मोह सुटेना अऩ देव भेटेना.

 41. म्हननाऱ्यानं म्हण केली, अऩ जाननाराले अक्कल आली.

 42. म्हशीने रांधलं आणि हेल्याने खाल्लं.

 43. म्हसोबाला नव्हती बायको अऩ सटवा‌ईला नव्हता नवरा.

 44. म्हातारी मेल्याचं दु:ख नाही पण काळ सोकावतो.


| मुख्य पान | प्रस्तावना | आभार | पाउलवाट | पाउलखुणा | प्रतिसाद | माझ्या आठवणीतली म्हण |
a aa o au aM aH i I u uu e ai a aa o au aM aH ru ka kha ga gha ca cha ja jha t Th Da Dh na ta tha d dha n pa fa ba bha ma ya ra l va sh sha sa ha la ksha dnya shra
| Home | Introduction | Thanks! | View My Guestbook | Sign My Guestbook | Send feedback! | Add Mhan |