आठवणीतल्या म्हणींची साठवण.

   

 1. न कर्त्याचा वार शनिवार.

 2. न खाणाऱ्या देवाला नेवेद्य.

 3. न लागो पुत्राचा हात पण लागो डोंब्या महाराची लाथ.

 4. नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न.

 5. नकटे व्हावे पण धाकटे हो‌ऊ नये.

 6. नको तिथं बोटं घालू नये, घातलेच तर वास घेत बसू नये.

 7. नगाऱ्याची घाय तिथे टिमकीचे काय?

 8. नमनाला घडाभर तेल.

 9. नरो वा कुंजारोवा.

 10. नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे.

 11. नवरा केला सुखासाठी, पैसा नाही कुकासाठी.

 12. नवरा नाही घरी सासरा जांच करी.

 13. नवऱ्याने मारले पावसाने झोडपले तक्रार कुणाकडे न्यायची.

 14. नवा कावळा शेण खायला शिकला.

 15. नव्याची नवला‌ई.

 16. नव्याचे न‌ऊ दिवस.

 17. नसुन खोळंबा असुन दाटी.

 18. ना घरचा ना घाटचा.

 19. नांदणाऱ्याला पळ म्हणायचे आणि पळणाऱ्याला नांद म्हणायचे.

 20. नांव अन्नपुर्णा, टोपल्यात भाकर उरेना.

 21. नांव गंगुबा‌ई अऩ तडफडे तान्हेने. (नांव गंगाबा‌ई अन तडफडे तहानेने). (नांव गंगाबा‌ई, रांजनात पाणी नाही).

 22. नांव महीपती, तीळभर जागा नाही हाती.

 23. नांव मोठे लक्षण खोटे.

 24. नांव सगुणी करणी अवगुणी.

 25. नांव सुलोचना आणि डोळ्याला चष्मा.

 26. नांव सोनुबा‌ई अन हाथी कथिलाचा वाळा.

 27. नाक दाबले की तोंड उघडते.

 28. नाकपेक्षा मोती जड.

 29. नाकाला नाही जागा, नाव चंद्रभागा

 30. नाकावर पदर अन विशीवर नजर.

 31. नागड्या कडे उघडा गेला आणि हिवाने मेला.

 32. नागोबा म्हसोबा पेंश्याला दोन, पंचमी झाल्यावर पुजतयं कोण?

 33. नाचता ये‌ईना म्हणे अंगण वाकडे, स्वयंपाक ये‌ईना म्हणे ओली लाकडे.

 34. नात्याला नाही पारा, निजायला नाही थारा.

 35. नाम असे उदार कर्ण, कवडी देता जा‌ई प्राण.

 36. नारो शंकराची घंटा.

 37. नालासाठी घोडं.

 38. नाव सोनुबा‌ई हाथी कथिलाचा वाळा.

 39. नाव्ह्याचा उकरंडा कितीही उकरला तरी केसच निघणार.

 40. नाही चिरा, नाही पणती.

 41. नाही निर्मल मन काय करील साबण.

 42. निर्लज्याच्या गांडीवर घातला पाला गार लागला अजून घाला.

 43. नेमेचि येतो मग पावसाळा.

 44. नेशीण तर पैठणी नाहीतर नागवी बसेन.

 45. न्हाणीला बोळा आणि दरवाजा मोकळा.


| मुख्य पान | प्रस्तावना | आभार | पाउलवाट | पाउलखुणा | प्रतिसाद | माझ्या आठवणीतली म्हण |
a aa o au aM aH i I u uu e ai a aa o au aM aH ru ka kha ga gha ca cha ja jha t Th Da Dh na ta tha d dha n pa fa ba bha ma ya ra l va sh sha sa ha la ksha dnya shra
| Home | Introduction | Thanks! | View My Guestbook | Sign My Guestbook | Send feedback! | Add Mhan |