पंचमुखी परमेश्वर.
पंत मेले, राव चढलॆ.
पडतील स्वाती तर पिकतील मोती.
पडत्या फळाची आज्ञा.
पडलो तरी नाक वर.
पडू आजारी, मौज वाटे भारी.
पत्रावळी आधी दोणा, तो जावई शहाणा.
पदरी पडले आणि पवित्र झाले.
परदु:ख शितल असते.
पराचा कावळा करणे.
पळत भुई थोडी.
पहिला दिवशी पाहुणा, दुसऱ्या दिवशी पयी, तिसऱ्या
दिवशी थारी अक्कल आधी गयी.
पहिले पाठे पंच्चावन्न.
पाचावर धारण बसली.
पाटलाचं घोडं महाराला भुषण.
पाठीवर मारावे पण पोटावर मारू नये.
पाण्यात म्हैस वर मोल.
पाण्यात राहून माशाशी वैर?
पाण्यावाचून मासा झोपा घेई केसा, जावे त्याच्या
वंशा तेव्हा कळे.
पादऱ्याला पावटाचे निमित्त. (पादऱ्याला पावट्याच
आधार.)
पादा पण नांदा.
पानामागून आली अन तिखट झाली. (अगसली ती मागासली, मागाहून
आली ती गरोदर राहीली.)
पाप्याचं पितर आणि वर आला जवर.
पाय धु म्हणे तोडे केवढ्याचे?
पायलीची सामसूम, चिपट्याची धामधूम.
पायाखालची वाळू सरकली.
पायातली वाहन पायात.
पारध्याच गोड गाणं, हरिणीसाठी जेवघेणं.
पारावरला मुंजा.
पालथ्या घडावर पाणी. (पालथ्या घागरीवर पाणी.)
पिंजऱ्यामध्ये व्याघ्र सापडे, बायका मुले मारती
खडे.
पिंपळाला पाने चार.
पिकतं तिथे विकत नाही.
पिकले पान केव्हातरी गळून पडणारच.
पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा.
पितळ उघडे पडले.
पी हळद अऩ हो गोरी.
पुढच्याच ठेच मागचा शहाणा.
पुत्र व्हावा ऎसा गुंडा ज्याचा तिन्ही लौकी झेंडा.
पुराणातील वानगी पुराणात.
पुरुषांचे मरण शेती, बायकाचे मरण वेतीं (प्रसुती).
पेरावे तसे उगवते.
पैशाकडेच पैसा जातो.
पोकळ वाशांचा आवाज मोठा.
पोट भरे खोटे चाले.
पोटात नाही दाणा म्हणे रामकृष्ण म्हणा.
प्रयत्नांती परमेश्वर.
प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेल ही गळे.