आठवणीतल्या म्हणींची साठवण.

   

 1. संन्यासाच्या लग्नाला शेंडीपासून (सुरुवात) तयारी.

 2. सख्ख्या सासूला दिली लाथ, चुलत सासूचा कापला कान, तिथे मामे-सासू मागते मान.

 3. सगळं मुसळ केरात.

 4. सतरा कारभारी ऐक नाही दरबारी.

 5. सतरा पुरभय्ये अऩ अठरा चुली.

 6. सदाला चोळी आणि वऱ्हाडाला पोतेरी.

 7. सरड्याची धांव कुंपणापर्यंत अन मुल्लाची मशिदीपर्यंत.

 8. सळो की पळो केले.

 9. सवळं दाट अन महारवाड्यातून वाट.

 10. ससा उठला आणि कुत्रे हागायला बसले.

 11. साखरेचे खाणार द्याला देव देणार.

 12. साठी बुध्दी नाठी.

 13. साडी नेली बायनं नि चिंधी नेली गायनं.

 14. सात सुगरणी, भाजी अळणी.

 15. साता उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी संपूर्ण.

 16. साता समुद्राकडे राजाने लावला भात, ऐक ऐक शीत न‌ऊ न‌ऊ हात.

 17. साधली तर शिकार नाही तर भिकार.

 18. साधी राहणी अनं उच्च विचार सरणी.

 19. साध्वा जाते विधवेपाशी आशिर्वाद मागायला, ती म्हणते माझ्यासारखीच हो!

 20. साप मुंगसाचे वैर.

 21. साप म्हणू नये आपला, नवरा म्हणू नये आपला.

 22. सारा गांव मामाचा एक नाही कामाचा.

 23. सासू तशी सून आणि उंबऱ्या तुझा गुण.

 24. सासू न सासरा जांच करे तिसरा.

 25. सासू नाही घरी, नणंद जाच करी.

 26. सासू मेली ठीक झाले, घरदार हाती आले.

 27. सासू सांगे सुने बोध, आपण पी ऊन ऊन दुध.

 28. सासू सांगे सुनेला आणि आपण जा‌ई गोल्या पाठून.

 29. सासू सुनेची भांडणं, सगळ्या गावाला आमंत्रणं.

 30. साहेबंनी रेड्याचे दुध काढले तर तो चरवी कुठे आहे म्हणून विचारतो.

 31. सुंठेवाचून खोकला गेला.

 32. सु‌ईण आहे, तो पर्यंत बाळंत हो‌ऊन घ्यावे.

 33. सुख रा‌ई एवढे दु:ख पर्वता एवढे.

 34. सुगंध पसरावयाचा असेल तर चंदनाला झिजावे लागते.

 35. सुतावरून स्वर्ग गाठायचा.

 36. सुसरबा‌ई, तुझी पाठ म‌ऊ.

 37. सोनार शिंपी कुलकर्णी अप्पा, यांची संगत नको रे बाप्पा.

 38. सोन्याची सुरी असली म्हणून काय उरात खुपसुन घ्यायची.

 39. सोन्याहून पिवळे.

 40. सोवळं सोडल्यावर ओवळं सापडू नये.

 41. स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही.

 42. स्वत:ची सावली विकून खाणारी माणसं.

 43. स्वभावाला औषध नाही.

 44. स्वामी तिन्ही जगाचा आ‌ईविना भिकारी.


| मुख्य पान | प्रस्तावना | आभार | पाउलवाट | पाउलखुणा | प्रतिसाद | माझ्या आठवणीतली म्हण |
a aa o au aM aH i I u uu e ai a aa o au aM aH ru ka kha ga gha ca cha ja jha t Th Da Dh na ta tha d dha n pa fa ba bha ma ya ra l va sh sha sa ha la ksha dnya shra
| Home | Introduction | Thanks! | View My Guestbook | Sign My Guestbook | Send feedback! | Add Mhan |