Created and maintained by Anand Savkar. Please visit my home page.

  1. चणे खा‌ईल लोखंडाचे

  2. चमडी जा‌ईल पण दमडी जाणार नाही.

  3. चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे.

  4. चार आण्याची कोंबडी अऩ बारण्याचा मसाला.

  5. चिपट्यात काय काय करू?

  6. चुकलेला फकीर मशिदीत.

  7. चोर तो चोर वर शिरजोर.

  8. चोराच्या उलट्या बोंबा.

  9. चोराच्या मनांत चांदणं.

  10. चोराच्या वाटा चोरालाच माहीत.

  11. चोराच्या हाती जामदाखान्याच्या किल्या.

  12. चोरावर मोर.


  1. छडी लागे छमछम विद्या येई घमघम.


  1. जशास तसे.

  2. जा‌ईचा डोळा नि आसवांचा मेळा.

  3. जात्यातले रडतात, सुपातले हसतात.

  4. जाळाशिवाय नाही कढ अऩ माये शिवाय नाही रड.

  5. जावयाचं पोर हरामखोर.

  6. जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाते उध्दारी.

  7. जित्याची खोड मेल्यावाचून जात नाही.

  8. जुने ते सोने.

  9. जेथे पिकतं तिथे विकतं नाही.

  10. जेन देखे रवि तेन देखे कवि.

  11. जो गुण बाळा तो जन्म काळा.

  12. जोवरी पैसा तोवरी बैसा.

  13. ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाभळी.

  14. ज्याचं करावं भलं तोच म्हणतो आपलचं खर.

  15. ज्याच्या हाती ससा तो पारधी.

  16. ज्याच्यासाठी लुगडं तेच उघडं.


  1. झाकली मुठ सव्वालाखाची.


| Home |