Created and maintained by Anand Savkar. Please visit my home page.

  1. त वरून ताकभात.

  2. तळे राखी तो पाणी चाखी.

  3. ताकापुरते रामायण.

  4. तुझं अऩ माझं जमेना तुझ्यावाचुन करमेना.

  5. तुम्ही करा अऩ आम्ही निस्तरा.

  6. तेरड्याचे रंग तीन दिवस.

  7. तेल गेले, तुप गेले, हाती आले धोपाटणे.


  1. थेंबे थेंबे तळे साचे.


  1. दांत आहे तर चणे नाहीत, चणे आहेत तर दांत नाहीत.

  2. दाम करी काम.

  3. दिवस गेला रेटारेटी, चांदण्यात बसली कापूस वेचीत.

  4. दिव्याखाली नेहमी अंधार.

  5. दिसतं तस नसतं म्हणून तर जग फसतं.

  6. दुःख रेड्याला न डाग पखालीला.

  7. दुरून डोंगर साजरे.

  8. दुष्काळात तेरावा महिना.

  9. दृष्टी आड सृष्टी.

  10. देखल्या देवा दंडवत.

  11. देव तारी त्याला कोण मारी.

  12. देवाचं नावं अऩ स्वताच गावं.

  13. दैव देतं अऩ कर्म नेतं.

  14. दोन डोळे शेजारी, भेट नाही संसारी.



  1. न कर्त्याचा वार शनिवार.

  2. नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न.

  3. नकटे व्हावे पण धाकटे हो‌ऊ नये.

  4. नरो वा कुंजारोवा.

  5. नव्याची नवला‌ई.

  6. नव्याचे न‌ऊ दिवस.

  7. नाकपेक्षा मोती जड.

  8. नाचता ये‌ईना म्हणे अंगण वाकडे, स्वयंपाक ये‌ईना म्हणे ओली लाकडे.

  9. नाव गंगुबा‌ई अऩ तडफडे तान्हेने.

  10. नाव मोठे लक्षण खोटे.

  11. नाव सुलोचना आणि डोळ्याला चष्मा.

  12. नाव सोनुबा‌ई हाथी कथिलाचा वाडा.

  13. नावडतीचे मीठ आळणी.


| Home |