Make your own free website on Tripod.com
You need to have Langscape Devnagari font installed on your computer to view this page. To install Please click here. Created and maintained by Anand Savkar. Please visit my home page.

 1. येरे माझ्या मागल्या, ताक कण्या चांगल्या.


 1. रंग झाला फिका आणि दे‌ईना कुणी मुका.

 2. राजा उदार झाला अऩ हाती भोपळा दिला.

 3. राजा तशी प्रजा.

 4. राजा बोले अऩ दल चाले.

 5. राजाला दिवाळी काय ठा‌ऊक?

 6. रात्र थोडी अऩ सोंग फार.

 7. रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी.

 8. रोज मरे त्याला कोण रडे.


 1. लंकेत सोन्याच्या विटा.

 2. लग्न बघावे करून अऩ घर पहावे बांधून.

 3. लाखाचे बारा हजार.

 4. लाथ मारेन तिथे पाणी काढीन.

 5. लेकी बोले सुने लागे.

 6. लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण कोरडे पाषाण.


 1. वाजे पा‌उल आपले म्हणे मागून कोण आले.

 2. वासरात लंगडी गाय शहाणी.

 3. विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर.

 4. वेळना वखत आऩ गाढव चाललय भुकत.

 5. वेळेला केळं अऩ वनवासाला सिताफळं.


 1. शहाण्याला शब्दाचा मार.

 2. शितावरून भाताची परीक्षा.

 3. शिर सलामत तर पगड़ी पचास.

 4. शुभ बोल नाऱ्या तर म्हणे मांडवाला आग लागली.

 5. शेरास सव्वाशेर.

 6. शेळी जाते जीवनाशी, खाणारा म्हणतो वातड. 1. सतरा पुरभय्ये अऩ अठरा चुली.

 2. सरड्याची धाव कुंपणापर्यंत.

 3. साखरेचे खाणार द्याला देव देणार.

 4. साठी बुध्दी नाठी.

 5. साता उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी संपूर्ण.

 6. साप म्हणू नये आपला, नवरा म्हणू नये आपला.

 7. सुसरबा‌ई, तुझी पाठ म‌ऊ.

 8. सोन्याहून पिवळे.

 9. स्वामी तिन्ही जगाचा आ‌ईविना भिकारी.


 1. हजीर तो वजीर.

 2. हत्ती गेला अऩ शेपुट राहिले.

 3. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र.

 4. हसणाऱ्याचे दांत दिसतात.

 5. हा सुर्य अऩ हा जयद्रथ.

 6. हात फिरे तिथे लक्ष्मी वसे.

 7. हातच्या काकणाला आरसा कशाला?

 8. हौसेनं केला पति, त्याला भरली रक्तपीती.
| Home |