Created and maintained by Anand Savkar. Please visit my home page.

  1. कर नाही त्याला ड़र कशाला?

  2. करायला गेलो एक अऩ झाले एक.

  3. करावे तसे भरावे.

  4. कशात काय अऩ फाटक्यात पाय.

  5. काखेत कळसा अऩ गावाला वळसा.

  6. कानामागून आला अऩ तिखट झाला.

  7. काम ऩ धंदा, हरी गोविंदा.

  8. कामापुरता मामा अऩ ताकापुरती आजी.

  9. काय करु अऩ कस करु?

  10. कावळ्याचे दांत शोधण्यासारखे.

  11. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही.

  12. कुठे इंद्राची ऐरावत आणि कुठे शांभाट्टाची तट्टानी.

  13. कुठे जाशी भोगा तर तुझ्या पाठी उभा.

  14. कुठेही जा, पळसाला पाने तीनच.

  15. कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच.

  16. कुऱ्हाडीचा दांडा, गोतास काळ.

  17. केला जरी पोत बरेच खाली, ज्वाळा तरी ते वर उफाळी.

  18. कोंबडे झाकले म्हणून उजडायचे राहत नाही.

  19. कोणाला कशाचं तर बोड्कीला केसाचं.

  20. कोल्ह्यास द्राक्षे आंबट.


  1. खा‌ई त्याला खवखवे.

  2. खा‌ईन तर तुपाशी नाहीतर उपाशी.

  3. खायला आधी, निजायला मधी आणि कामाला कधी.

  4. खायला कहर आणि भु‌ईला भार.

  5. खायला कोंडा अऩ निजायला धोंडा.

  6. खाली मुंडी, पाताळ धुंडी.

  7. खिशात नाही आणा अऩ म्हणे मला बाजीराव म्हणा.


  1. गंगेत घोडं न्हालं.

  2. गरज सरो अऩ वैद्य मरो.

  3. गरजेल तो पडेल काय?

  4. गवयाचे मुल सुरांनीच रडणार.

  5. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली.

  6. गाढवाबरोबर वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता.

  7. गाढवाला गुळाची चवं काय?

  8. गाव करील ते राव करील काय?

  9. गुळवणी नाहीतर गुळाचार कुठून?

  10. गोगल गाय पोटात पाय.


  1. घर फिरले की वासेही फिरतात.

  2. घरचे झाले थोडे अऩ व्याहीने धाडले घोडे.

  3. घरोघरी मातीच्या चुली.

  4. घोडं झालय मराया बसणारा म्हणतो मी नवा.

  5. घोडी मेली ओझ्यानं नि शिंगरू मेलं हेलपाट्यानं.


| Home |