Make your own free website on Tripod.com
Created and maintained by Anand Savkar. Please visit my home page.

 1. पंचमुखी परमेश्वर.

 2. पडतील स्वाती तर पिकतील मोती.

 3. पडत्या फळाची आज्ञा.

 4. पहिले पाठे पंच्चावन्न.

 5. पाटलाचं घोडं महाराला भुषण.

 6. पाण्यात म्हैस वर मोल.

 7. पाण्यावाचून मासा झोपा घे‌ई केसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.

 8. पादऱ्याला पावटाचे निमित्त.

 9. पानामागून आली अऩ तिखट झाली.

 10. पालथ्या घागरीवर पाणी.

 11. पी हळद अऩ हो गोरी.

 12. पेरावे तसे उगवते.

 13. प्रयत्नांती परमेश्वर.

 14. प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेल ही गळे. 1. बड़ा घर पोकळ वासा.

 2. बळी तो कान पिळी.

 3. बा‌ईल गेलीया अऩ झोपा केला.

 4. बाजारात नाही तुरी भट भटणीला मारी.

 5. बाप दाखव नाही तर श्राध्दं कर.

 6. बाळाचे पाय पाळ्ण्यात दिसतात.

 7. बुडत्याचे पाय खोलात.

 8. बुडत्याला काडीचा आधार.

 9. बेशरमाच्या ढुंगणाला फुटले झाड तो म्हणतो मला सावली झाली.

 10. बोलाचीच कढी अऩ बोलाचाच भात.

 11. बोलेल तो करेल काय? गरजेल तो पडेल काय?


 1. भटाला दिली ओसरी भट हात पाय पसरी.

 2. भरल्या ब्राह्मणाला दही करकरीत.

 3. भरवश्याच्या म्हशीला टोणगा.

 4. भिक नको पण कुत्रा आवर.

 5. भित्यापाठी ब्रम्हराक्षस.

 6. भुकेच्या तापे करवंदीची कापे.

 7. भुकेला पिकलं काय? अऩ हिरवं काय?


 1. मनी चिंती ते वैरीही न चिंती.

 2. मनी वसे ते स्वप्नी दिसे.

 3. मला नं तुला, घाल कुत्र्याला.

 4. मला पहा अऩ फुले वहा.

 5. माय मरो पण मावशी उरो.

 6. मिया मुठभर, दाढी हातभर.

 7. मी नाही त्यातली अऩ कडी लावा आतली.

 8. मेल्या म्हशीला शेरभर दुध.

 9. मेल्यावाचून स्वर्ग दिसत नाही.

 10. मोडेन पण वाकणार नाही.

 11. मोह सुटेना अऩ देव भेटेना.

 12. म्हननाऱ्यानं म्हण केली, अऩ जाननाराले अक्कल आली.

 13. म्हसोबाला नव्हती बायको अऩ सटवीला नव्हता नवरा.

 14. म्हातारीला मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो.


| Home |